Posts

लोकमान्य टिळक आणि महर्षी शिंदे - आदरयुक्त विरोधभावाचे नमुनेदार उदाहरण

Image
              समाजसुधारकांची विचारदृष्टी, कार्यपद्धती तसेच त्यांच्यातील भावसंबंधाचे त्या त्या काळसंदर्भात आकलन मांडणे गरजेचे ठरते.  या परस्परसंबंधातून त्यांच्या कार्यशैलीचा काळ आणि घडामोडींचा मागोवा, पुनरालोकन समाजेतिहासाच्या दृष्टीने पाहणे कधीही महत्त्वाचे ठरते. महापुरुषांच्या विचारकार्याला त्या त्या काळाची संदर्भचौकट असते. त्यामुळे काळ, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पहायला हवे. सध्याचा काळ अस्मितांचा वा व्यक्तींच्या अतिप्रेमापोटी अनाठायी भळभळण्याचा काळ आहे. समाजसुधारकांच्या कार्याचे आकलन हे एकांगी व अनैतिहासिक रीतीने करण्याच्या पद्धती रूढ होत आहेत. महापुरुषांत नसणार्‍या विरोधभावाची चर्चा करण्यात बुध्दिमतांनाही धन्यता वाटत आहे. गांधी विरूद्ध आंबडेकर, नेहरू विरूद्ध जीना, टिळक विरूध्द शाहू, महर्षी शिंदे विरूद्ध आंबडेकर अशी विचारद्वंदे कल्पिण्यात आणि त्यात अनाठायी उर्जा घालविण्यात आधुनिक चर्चाविश्वाला रस आहे. कोण बरोबर कोण चुकीचे याची अहमिकेने वा वितंडवादाने चर्चा घडवली जाते. बर्‍याच वेळा त्यात पक्षपातीपणा येतो.  गतसमाजेतिहा...

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने - पर्यायी शक्यतांचा शोध

Image
                                                                                                                                      अण्णा भाऊ साठे यांची शताब्दी सांगताप्रसंगी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाची आठवण होणे स्वाभाविक आहे. या संमेलन उभारणीकल्पनेत आणि आयोजनात कॉ.गोविंद पानसरे यांचा मोठा वाटा होता. पानसरे यांच्या  प्रज्ञाशील सांस्कृतिक कार्याचा हा एक विलोभनीय आविष्कार म्हणून देखील या संमेलन संस्कृतीकडे पाहू शकतो. अण्णा भाऊंच्या  'लेखककेंद्री' साहित्य संमेलनाबद्द्ल त्यावेळी अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. मात्र संमेलनांच्या मिळालेल्या प्रतिसादप्रभावामुळे अनेक मंडळी आपणहून त्यात सहभागी झाली. पानसरे यांचा वेगवेगळी संमेलने भरविण्यामाग...

स्मरण अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे

Image
            अण्णा भाऊ साठे यांनी बहुविध स्वरूपाची वाङ्मयनिर्मिती केली. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीला अनेकविध स्वरूपाची परिमाणे आहेत. सामाजिकदृष्ट्या अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्मरण हे नेहमीच समाजाला प्रेरक आहे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सा रख्या छोट्या गावात अण्णा भाऊंचा जन्म झाला. रूढ शिक्षण न झालेले मात्र अवतीभवतीच्या समाजजीवनाने व सजीव अशा लोकपरंपरेने त्याचा मनःपिंड घडला. लहानपणीच अण्णा भाऊंच्या कुटुंबाला उपजीविकेसाठी मुंबईला जवळ करावे लागले. आणि एका नव्या संघर्ष भूमीत अण्णा भाऊंचा प्रवेश झाला. मुंबईच्या वास्तव्याने त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. एका कार्यकर्ता ,   लेखक , कवी म्हणून त्यांची घडण या शहराने केली.             अण्णा भाऊंच्या सम ग्र लेखनात वर्गीय-जातीय भानाचा आविष्कार आहे. त्यांच्या वाङ्मयातील माणसे ही सर्वसामान्य , वंचित , कामगार , पीडित आहेत. ही पिचलेली मात्र न डगमगणारी जीवनाच्या संघर्षभूमीत सदैव उभी राहणारी. म्हणूनच प्र. क. अत्रे यांनी लढणार...

आठवणी किर्लोस्करवाडीच्या

Image
    1999  ते 2005 या काळात मी कुंडल (जि. सांगली) येथे जी. डी. बापू लाड महाविद्यालयात मी प्राध्यापक होतो. यातील तीन साडेतीन  वर्षे  सावंतपूर वसाहतीतील  मनोहर ग्रामोपाध्ये यांच्या घरी वरच्या मजल्यावर रहात असे. अवतीभवतीचा परिसर गर्द झाडांचा. आंबा, रामफळ, चाफा, गुलामोहराची झाडे आणि थोड्या अंतरावर ऊसमळे लगत परिसरात होते. निरंतर शांतता असणारा तो परिसर. तो काळ बहुधा कंपनीचा  मंदीकाळ असावा असे लोकांच्या बोलण्यावरून जाणवायाचे. परिसरातील नोकरदारांचा ओढा  पुण्याकडे जाण्याकडे  होता.            कुंडल आणि किर्लोस्करवाडीचा परिसर  हिरव्यागार शेतीने बहरलेला. समृद्ध आणि संपन्न भूमीप्रदेश. या परिसराच्या मनात गोठवलेल्या आठवणी पुनःपुन्हा खेचून घेतात.  नोकरीचा हा आरंभकाळ होता. विद्यार्थीदशेचा काळ संपून  जगण्याच्या प्रत्यक्ष व्यवहारात प्रवेशित झालो होतो. एका नव्या मुलखात, अनोळखी माणसांच्या जगात दाखल झालो होतो. बरोबर   नव्यानेच नोकरीस रुजू झालेली आम्ही काही (बॅचलर) प्राध्यापक  मंडळी होती. पगारही जे...

आठवणीतील गो. मा. पवार सर

Image
.      ( १६.०४.२०२०)      आज डॉ गो. मा. पवार सरांचा पहिला स्मृतिदिन. त्यांच्या नसण्याचे रितेपण माझ्यासह कित्येकांना अस्वस्थ करत असावे. काळ खूप वेगाने पुढे पुढे सरकत राहतो आणि लगतच्या भूतकाळातील आठवणी देखील निसटत जातात. प्रत्येकाच्या जीवनप्रवासात अशा व्यक्तींच्या सहवासाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्नता लाभलेली असते. मात्र नेहमीच्या रुटीन कामाच्या घाईगर्दीमुळे या व्यक्तींच्या आठवणी धूसर होत जातात. त्यावर वर्तमानाची पुटे साचत जातात. मात्र नेणीवेत दबा धरून बसलेल्या भावसंबंधाच्या आठवणी अपराधभावाने व्याकुळ करतात. तसेच रितेपणाच्या जाणीवेने अस्वस्थही करतात.              भाषासाहित्याचे नामवंत प्राध्यापक , साक्षेपी समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे निष्ठावान अभ्यासक अशी त्यांची ओळख.या त्यांच्या काही आठवणी, अर्थात त्या केवळ गतस्मरण स्वरूपाच्या नाहीत. सरांच्या या आठवणीतून त्यांच्या दृष्टिकोणावर व काळस्वभावावर देखील प्रकाश पडेल. 1999 साली मी सरांच्या संपर्कात आलो तेंव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत निरंत...

ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर

Image
(३१.०३.२०१९)  तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक प्रा. वसंत पापळकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी बार्शी येथे दुःखद निधन झाले. त्यांचा जन्म व शिक्षण विदर्भात झाले. त्यानंतर नोकरी निमित्ताने त्यांचे कायमचे बार्शीत वास्तव्य घडले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ शिवाजी महाविद्यालयात काम केले. विद्यार्थिप्रेमी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत त्यांच्याकडे नेहमीच आदरभावाने पाहिले गेले.  विज्ञानातील तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा प्रांत होता. भारतीय दर्शनांचा त्यांनी नवा अर्थ लावला. शंकराचार्य, वेदांत, न्यूटन ते आइन्स्टाइन ही त्यांची शोधयात्रेच्या विसाव्याची केंद्रे होती. त्यांनी मराठी संतपरंपरेचा कालोचित अर्थ लावला.                अध्यापनाबरोबर  संस्थात्मक पातळीवर देखील त्यांनी काम केले. बार्शीच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. बार्शी येथे संपन्न झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एवढेच नव्हेतर या संमेलनात ' कविता- असणे व होणे ' या त्यांच्या ...