Posts

Showing posts with the label Chitrkar

चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली

Image
    कोल्हापूर चित्रशैलीला कोल्हापूर स्कूल म्हणून एक वेगळी ओळख आहे . निसर्ग , व्यक्तिचित्रे व वास्तववादी चित्रस्कूल म्हणून तिला समृद्ध परंपरा लाभली . रांगड्या , भरड कोल्हापूरी बाजाच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी अभिनेते चंद्रकांत मांडरे यांनी गाजवली . या मांडरे यांची चित्रकार म्हणूनही वेगळी ओळख आहे . भावूक डोळ्यांचा आणि उधळमोकळ्या देहबोलीच्या अभिनयाचा साज चंद्रकांत मध्ये होता . बाबूराव पेंटर व बाबा गजबर हे त्यांचे चित्रकलेतले गुरू होते .       चंद्रकांत यांची चित्रे प्रामुख्याने निसर्गचित्रे आहे . निसर्गाविषयी त्यांना कमालीचे आकर्षण असावे . निसर्गातील सूक्ष्म भावस्पंदने टिपावीत असा एक त्यांचा ध्यास होता . सृष्टीतले आकार , रंगसौंदर्याची संगती त्यांच्या चित्रांत आहे . कौंटुबिक , ऐतिहासिक , पौराणिक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या .       विजापूरमधील ऐतिहासिक खंदकाचे चित्र , त्यातील पाण्याचा संथ वाहता प्रवाह , किल्ल्याच्या कमानी , हिरवीगार झुडपे अशा चित्रांपासून ते व्य क्तिचित्रणातील चेहऱ्यावरील प्रसन्न देहब...