Posts

Showing posts with the label ललित व इतर

गोयां तुज्या मोगाखातीर

Image
पुस्तके आवरत असताना अचानक एक वेगळा कवितासंग्रहात हाताशी आला. संग्रहाच्या प्रकाशनाच्या तपशिलाच्या ठिकाणी   वेगळे शब्द पाहायला मिळाले. आणि कुतूहल अधिक चाळवले. त्यात किंमतीसाठी ' मोल ', मुद्रणासाठी ' छापपी ', मुखपृष्ठासाठी ' मुखचित्र ', पहिल्या आवृत्तीसाठी ' पयली खेप ', प्रकाशनासाठी ' उजवाडावनी ' या शब्दाने खिळवून ठेवले आणि कानामनात कोकणी भाषेचा नाद गुंजत राहिला. निमित्त माधव बोरकर यांचा ' अव्यक्ताची गाणी ' हा कोकणी भाषेतील कवितासंग्रह. साठेक पानांच्या या कवितासंग्रहातील कोकणी भाषेने जिज्ञासा अधिक वाढवली , त्याआधी कोकणी भाषेचे नाद मनात साठलेले होतेच. त्याला या कवितारूपाने हलकासा आवाज प्रतिसाद मिळाला.   साहित्याच्या अंगणामध्ये भाषा ,  संस्कृती , भूगोलाची बंधनं नसतात याची जणू झलक या कविता भाषेने अधिक दुणावली. यापूर्वीही गोव्यातील कोकणी भाषेचे लहजे , सुरावटी , आकारांत आणि ओकारान्त , ' ना ' कारान्त ( नासिक्य उच्चारांची) भाषारूपांची वेगळी गंमत वाटायची. या नाद भाषेने स्वाभाविकच त्याकडे ओढला गेलो. बोरकारांच्या काव्यसंवेदन स्वभावाचा एक ...

आठवणी किर्लोस्करवाडीच्या

Image
    1999  ते 2005 या काळात मी कुंडल (जि. सांगली) येथे जी. डी. बापू लाड महाविद्यालयात मी प्राध्यापक होतो. यातील तीन साडेतीन  वर्षे  सावंतपूर वसाहतीतील  मनोहर ग्रामोपाध्ये यांच्या घरी वरच्या मजल्यावर रहात असे. अवतीभवतीचा परिसर गर्द झाडांचा. आंबा, रामफळ, चाफा, गुलामोहराची झाडे आणि थोड्या अंतरावर ऊसमळे लगत परिसरात होते. निरंतर शांतता असणारा तो परिसर. तो काळ बहुधा कंपनीचा  मंदीकाळ असावा असे लोकांच्या बोलण्यावरून जाणवायाचे. परिसरातील नोकरदारांचा ओढा  पुण्याकडे जाण्याकडे  होता.            कुंडल आणि किर्लोस्करवाडीचा परिसर  हिरव्यागार शेतीने बहरलेला. समृद्ध आणि संपन्न भूमीप्रदेश. या परिसराच्या मनात गोठवलेल्या आठवणी पुनःपुन्हा खेचून घेतात.  नोकरीचा हा आरंभकाळ होता. विद्यार्थीदशेचा काळ संपून  जगण्याच्या प्रत्यक्ष व्यवहारात प्रवेशित झालो होतो. एका नव्या मुलखात, अनोळखी माणसांच्या जगात दाखल झालो होतो. बरोबर   नव्यानेच नोकरीस रुजू झालेली आम्ही काही (बॅचलर) प्राध्यापक  मंडळी होती. पगारही जे...