Posts

Showing posts with the label Anuradha Patil

नव्या धूळपेरणीसाठी - वारी

Image
       वारी निमित्ताने आषाढ महिना महारा ष्ट्र पांडुरंगमय झालेला असतो. वारी हा कष्टकरी समाजाचा आनंदसोहळा . वारीची अनेक रूपे लेखक कलावंतांनी रेखाटली आहेत .   ´जाता पंढरी वाटे सुख´ या उत्कट भावनेने ती शब्दबध्द झाली आहेत . ´ सुख पाहता लोचनी / सुख झाले वो साजनी´ अशी विठ्ठलाची नित्य नवी रूपे अभिव्यक्त झाली आहेत . मातृपितृरूपाच्या छायेचा आदिबंध विठ्ठल रूपातून प्रकटला . या लोकभावनेचा निरंतर असा पाठलाग आधुनिक लेखक कवीं नी ही केला आहे . पंढरीमहात्म्य हा लेखक कवींचा मोठा तृष्णाबंध आहे . ही भावना जशी श्रध्दाभावनेच्या अंगाने   प्रकटली . तशीच ती विरोधभावा नेही प्रकटली आहे . आजच्या कवींनाही अभंग आणि ओवीचे कमालीचे आकर्षण आहे . माधव ज्यूलियन , बा . सी . मर्ढेकर , विंदा करंदीकर , मधुकर केचे , दिलीप पुरूषोत्तम चित्रे , अरूण कोलटकर , विलास पाटील ते इंद्रजित भालेराव यांनी पंढरीची विविध चित्रे रेखाटली आहेत . ´तुकानिर्मित सेतूवरूनी आलो ख्रिस्त चरणी´ असे रेव्हरंड ना. वा. टिळक म्हणू शकले. ' प...