Posts
नव्या धूळपेरणीसाठी - वारी
- Get link
- X
- Other Apps
वारी निमित्ताने आषाढ महिना महारा ष्ट्र पांडुरंगमय झालेला असतो. वारी हा कष्टकरी समाजाचा आनंदसोहळा . वारीची अनेक रूपे लेखक कलावंतांनी रेखाटली आहेत . ´जाता पंढरी वाटे सुख´ या उत्कट भावनेने ती शब्दबध्द झाली आहेत . ´ सुख पाहता लोचनी / सुख झाले वो साजनी´ अशी विठ्ठलाची नित्य नवी रूपे अभिव्यक्त झाली आहेत . मातृपितृरूपाच्या छायेचा आदिबंध विठ्ठल रूपातून प्रकटला . या लोकभावनेचा निरंतर असा पाठलाग आधुनिक लेखक कवीं नी ही केला आहे . पंढरीमहात्म्य हा लेखक कवींचा मोठा तृष्णाबंध आहे . ही भावना जशी श्रध्दाभावनेच्या अंगाने प्रकटली . तशीच ती विरोधभावा नेही प्रकटली आहे . आजच्या कवींनाही अभंग आणि ओवीचे कमालीचे आकर्षण आहे . माधव ज्यूलियन , बा . सी . मर्ढेकर , विंदा करंदीकर , मधुकर केचे , दिलीप पुरूषोत्तम चित्रे , अरूण कोलटकर , विलास पाटील ते इंद्रजित भालेराव यांनी पंढरीची विविध चित्रे रेखाटली आहेत . ´तुकानिर्मित सेतूवरूनी आलो ख्रिस्त चरणी´ असे रेव्हरंड ना. वा. टिळक म्हणू शकले. ' प...
चंद्रकांत मांडरे यांची चित्रशैली
- Get link
- X
- Other Apps
कोल्हापूर चित्रशैलीला कोल्हापूर स्कूल म्हणून एक वेगळी ओळख आहे . निसर्ग , व्यक्तिचित्रे व वास्तववादी चित्रस्कूल म्हणून तिला समृद्ध परंपरा लाभली . रांगड्या , भरड कोल्हापूरी बाजाच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी अभिनेते चंद्रकांत मांडरे यांनी गाजवली . या मांडरे यांची चित्रकार म्हणूनही वेगळी ओळख आहे . भावूक डोळ्यांचा आणि उधळमोकळ्या देहबोलीच्या अभिनयाचा साज चंद्रकांत मध्ये होता . बाबूराव पेंटर व बाबा गजबर हे त्यांचे चित्रकलेतले गुरू होते . चंद्रकांत यांची चित्रे प्रामुख्याने निसर्गचित्रे आहे . निसर्गाविषयी त्यांना कमालीचे आकर्षण असावे . निसर्गातील सूक्ष्म भावस्पंदने टिपावीत असा एक त्यांचा ध्यास होता . सृष्टीतले आकार , रंगसौंदर्याची संगती त्यांच्या चित्रांत आहे . कौंटुबिक , ऐतिहासिक , पौराणिक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या . विजापूरमधील ऐतिहासिक खंदकाचे चित्र , त्यातील पाण्याचा संथ वाहता प्रवाह , किल्ल्याच्या कमानी , हिरवीगार झुडपे अशा चित्रांपासून ते व्य क्तिचित्रणातील चेहऱ्यावरील प्रसन्न देहब...
पोरींच्या भावविश्वाच्या कहाण्या
- Get link
- X
- Other Apps
ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ एक वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे. चंद्रशेखर कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील किशोरवयीन मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे. --------------- चंद्रशेखर कांबळे यांचा 'शेणाला गेलेल्या पोरी' या शीर्षकाचा एक वेगळा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील किशोरवयीन मुलींच्या भावाजगाचा आलेख या कवितासंग्रहात आहे. वास्तविक पाहता मराठीमध्ये ग्रामीण संवेदनानुभवाची भरमसाठ कविता लिहिली जाते आहे. सामाजिक जीवनाचा एक मोठा भाग या प्रकारच्या कवितेतून साक्षात झाला आहे. या पार्श्वभूमीवर 'शेणाला गेलेल्या पोरी' मधील कविता ही एकल विषयसूत्री स्वरूपाची दीर्घकविता आहे. ग्रामीण जीवनातील किशोरवयीन मुलींचे शेणी गोळा करायला जाणे ही केवळ एक वस्तुनिष्ठ घटना नाही तर त्यामध्ये विविध प्रकारचे भान एकवटलेले आहे. शेणी या प्रदेशनिविष्ट शब्दासा...