ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर
(३१.०३.२०१९) तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक प्रा. वसंत पापळकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी बार्शी येथे दुःखद निधन झाले. त्यांचा जन्म व शिक्षण विदर्भात झाले. त्यानंतर नोकरी निमित्ताने त्यांचे कायमचे बार्शीत वास्तव्य घडले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ शिवाजी महाविद्यालयात काम केले. विद्यार्थिप्रेमी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत त्यांच्याकडे नेहमीच आदरभावाने पाहिले गेले. विज्ञानातील तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा प्रांत होता. भारतीय दर्शनांचा त्यांनी नवा अर्थ लावला. शंकराचार्य, वेदांत, न्यूटन ते आइन्स्टाइन ही त्यांची शोधयात्रेच्या विसाव्याची केंद्रे होती. त्यांनी मराठी संतपरंपरेचा कालोचित अर्थ लावला. अध्यापनाबरोबर संस्थात्मक पातळीवर देखील त्यांनी काम केले. बार्शीच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. बार्शी येथे संपन्न झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एवढेच नव्हेतर या संमेलनात ' कविता- असणे व होणे ' या त्यांच्या ...






Comments
Post a Comment