अण्णाभाऊसाठे यांच्या दृष्टीतील महाराष्ट्र
अण्णा भाऊ साठे यांची महाराष्ट्र संकल्पना ही व्यापक समाजशील स्वरूपाची आहे. त्यांच्या महाराष्ट्र संकल्पनेमागे राजकीय, सामाजिक विचारदृष्टीची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्र संकल्पनेचा उच्चार त्यांच्या लेखनात केंद्रीय स्वरूपात आहे. अनेक लेखकांनी महाराष्टा विषयीची जाण व्यक्त केली. त्यांच्या महाराष्ट्र रचितामागे काळ, प्रदेश, इतिहास तसेच समाज सत्तासंबंधाची जाणीव आहे. तसेच इतिहास परंपरेने घडविलेल्या महाराष्ट्र भूमीचा कानोसा देखील आहे.
मात्र या सगळ्यांपेक्षा अण्णाभाऊंची महाराष्ट्र संकल्पना अधिक व्यापक आहे. भूमी आणि भाषिक समूह म्हणून ती वर्धमान स्वरूपाची आहे. अण्णा भाऊंच्या शाहिरीत महाराष्ट्र इतिहास, भूमिपरंपरा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्य सामावलेले आहे. अण्णाभाऊंच्या महाराष्ट रचितावर मानवतावादी दृष्टीबरोबर भूमी वैभवाविषयीचा अत्यांतिक प्रेमभाव आहे.

अण्णाभाऊंच्या महाराष्ट्र वाचनात पर्यायी संस्कृती वाचनाचा इतिहास आहे. त्यांनी जो गण गायला तो 'प्रथम मायभूच्या चरणा'साठी. आणि महाराष्टलाभूषणावह ठरलेल्या शुभनामांच्या कर्तृत्व गौरवाचा इतिहास गाण्यासाठी. त्यांच्या महाराष्ट्र भूमी प्रेमामागे वास्तव भूगोलाचे परिमाण आहे. मराठी काव्यात महाराष्टभूमीचे रोमँटिक कल्पिताच्या पातळीवर पर्यावरण मोठ्या प्रमाणातआढळते. मात्र अण्णा भाऊंच्या कवितेत महाराष्ट्र भूगोलाचे व पर्यावरणाचे वेगळे भान प्रकटले आहे. त्यांच्या वाङ्मयातील भूमिसृष्टीत इथलीआहे. ती महाराष्टातील धानसृष्टी आहे.
मक्याची कणसे, हळद, भुईमूग, तूर भुईमुग, कापूस, गुळभेंडी, कारळा, राळा, ऊस, धान्याचा राजा शाळू, ताडमाड, सागाची झाडे, कळकिचे बेट, करवंदी, बाभळी, बोरी चिल्लारीचा प्रदेश त्यांच्या लेखनातून प्रकटला. 'महाराष्ट अंगणात खेळणाऱ्या सरिता आणि ‘धरणी कसेल त्याची सारी' असे भूमिभान व्यक्त झाले. त्यांच्या महाराष्ट्र संस्कृतीत ही श्रमकरी, कष्टकऱ्यांच्या संस्कृती आहे. कष्टकऱ्यांच्या संस्कृतीचा भाग म्हणून कामगार जीवन, त्यांच्या संघर्षाला आणि विजयी यात्रेला अण्णाभाऊंच्या कवितेत महत्त्वाची परिमाणे लाभतात.ही मायभूमि धीरांची - शासनकर्त्यांवीरांची, घामाची आणि श्रमाची / खुरप्याची आणि दोरीची' अशी त्यांची भावना आहे.

अण्णा भाऊंचे महाराष्ट्र प्रेम अतिशय उत्कट आणि संवेदनशील होते. त्यांच्या महाराष्ट्र गौरवाचा, स्वाभिमानी बाण्याचा एक पैलू राजकीय इतिहास कथनाच्या अंगाने व्यक्त झाला. सामाजिक आणि राजकीय चळवळीतला महाराष्ट्र त्याना कायम महत्त्वाचा वाटत आला. 'माझी मैना गावावर राहिली' या त्यांच्या राजकीय कवितेत महाराष्ट्र प्रेमाच्या वैभवाला बहर आला आहे. अखंड महाराष्ट्राच्या स्वप्नभूमीचा तीव्र ओढा या कवितेतून व्यक्त झाला. अखंड महाराष्ट्राचे प्रेम आणि विखंडित महाराष्ट्राची तगमग काहिली त्यानी व्यक्त केली. अशा महाराष्ट्राच्या गुणांची छक्कड त्यांना गाविशी वाटली. महाराष्ट्र भूमीपासून अलग राहिलेल्या प्रतिकात्मक भूमीरूपी प्रियेसाठी त्यांनी वापरलेली अस्सल मराठी अलंकारांच्या नावातून त्यांचे महाराष्ट्र प्रेम कळते. 'शिंदेशाही तोडा', 'साज कोल्हापुरी', 'वज्रटीक', 'गळ्यात माळ पुतळ्यांची', 'कानात गोखरं', 'पायात मासोळ्या', 'दंडात इळा', 'नाकात नथ सर्जाची', यावरून देखील त्यांच्या महाराष्ट्र प्रेमाची साक्ष पडते. अर्थात या दागिना अलंकारांचा वापर वैभवाचे स्मरण करणे नसून सामाजिक, राजकीय आशय व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक चिन्हांचा वापर केला. 'बिनी (आघाडी) मारायची राहिली अजून' असे राजकीय भान देणारी ही कविता आहे.
अण्णा भाऊंची 'महाराष्ट्राची परंपरा' कविता मराठी काव्यपरंपरेत महत्त्वाची गणली जावी अशा प्रकारची आहे. अण्णा भाऊंचा महाराष्ट्राची संकल्पना, इतिहास परंपरा विस्तार आणि महाराष्ट्रा विषयीचे स्वप्न त्यांच्या या कवितेतून व्यक्त झाले आहे. मराठी माणसांच्या गुणांचे वर्णन त्यामध्ये आहे. शिवकाळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास त्यामध्ये सामावलेला आहे. महाराष्ट्राचा निसर्ग, मराठ्यांच्या लढाया, इतिहास काळातील परकीय राजवटी विरुद्धची प्रति आक्रमणे, शौर्य, मावळ्यांचा लढाऊपणा, अठराशे सत्तावनचे बंड, प्रतिसरकारची लढाई आणि कामगार लढे समाविष्ट आहेत. अण्णा भाऊंच्या महाराष्ट्र इतिहास कथनात एक समग्रतावादी दृष्टी आहे. ती तोडणारी नाही, तर जोडणारीआहे. जुटीची एकमय भावना व्यक्त करणारी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांपासून, संत शाहिरी परंपरेपासून ते वंचितांच्या वीर नायकाचा इतिहास त्यांच्या महाराष्ट्र इतिहासदृष्टीत आहे.
महात्मा फुले, टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून तात्या टोपे, उमाजी नाईक, तांडेल, भंडारी, कोळी वारली, कोळी भिल्ल अशा अठरापगड जातींच्या अस्तित्व संघर्षाचे कथन त्यांच्या कवितेमध्ये आहे.अण्णाभाऊंच्या वाङ्मयात महाराष्ट´वीरनायकाच्या शौर्य बलिदानाचे चित्र अधिक उठावदार आणि वेधक असे आहे, अगदी प्रतीसरकारच्या चळवळीत 'ग्रामराज्या' साठी अविरत लढणाऱ्या महानायकांचा आठवत्यांच्या गाण्यांत आहे. महाराष्ट्राची परंपरा अखंड राहण्यासाठी आणि ती गतिशील होण्यासाठी या प्रकारचा सामुहिक राष्ट्रभाव त्यांच्या कवितेतून व्यक्त झाला.अण्णाभाऊंची जातसंबंधाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक आणि अधिक विस्तारशील आहे. तुलनेने अन्य कवींच्या कवितेतील महाराष्ट्र व्याप्ती आणि तिचा पसारा पाहिला असता अण्णाभाऊंच्या कवितेतील महाराष्ट्र संकल्पनेचा विकास अधिक विस्तारशील आणि अधिक व्यापक दृष्टीचा आहे. गोविंदाग्रजांच्या 'महाराष्ट्र गीता' तील महाराष्ट्र आणि अण्णाभाऊंच्या 'महाराष्ट्राची परंपरा' मधील महाराष्ट्रवाचन तुलनात्मकदृष्ट्या पाहिले असता दोहांतील अंतर आपल्या ध्यानात येते.
अण्णाभाऊंचा महाराष्ट्र अधिक गतिशील विस्तारशील सामूहिक राष्ट्रभावनेचा पुरस्कार करणारा आणि जनसामान्यांच्या महाराष्ट्राचे व्यापक चित्र मांडणारा आहे. अण्णाभाऊंच्या महाराष्ट्र वाचनाला महाराष्टीय समाजा संदर्भातील बहुमुखी परिमाणे लाभतात. त्यामुळे स्वाभाविकच त्याचा लंबक अधिक विस्तार पावला आहे. त्यामुळेच' ही अवनी आदिवाशांची /कोळी भिल्लांची /मांग रामोशांची/कैक जातींची प्राणाहूनही प्यार /परंपरा ज्याची असे अपरंपार' असे व्यापक दृष्टीचे भान अण्णाभाऊंच्या कवितेत आहे. एका अर्थाने अण्णाभाऊंचा महाराष्ट्र हा' सर्वजणांचा महाराष्ट´' आहे. अण्णा भाऊंच्या महाराष्ट्र कल्पनेत निसर्ग व भूमी पर्यावरणा विषयीचे वेगळे भान व्यक्त झाले आहे. इथला निसर्ग हा मानवाचा सहप्रवासी आहे. मानवी जीवनाच्या संदर्भात तो चैतन्यशील गती तत्त्वाचा पुरस्कार करणारा निसर्ग आहे. त्यामुळेच 'कारळा फुले गोजिरी उधळून महाराष्ट्रावर' असे चित्र येते. अण्णा भाऊंच्या महाराष्ट्र कल्पनेत ऐक्यभाव आणि उद्याच्या नवमहाराष्ट्र निर्माणाची कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विजयी गुढीचे आकर्षण आणि त्याच्या विजयाच्या अंतरीची काहिली पुन्हापुन्हा व्यक्त झाली आहे. 'लोकशाहीचे नंदनवन करणा या भु ला' असे तिचे वर्णन त्यांनी केले आहे.त्यामुळे अण्णा भाऊंची महाराष्ट्र कल्पना ही लोकशाही समतावादी राष्ट्र राज्याचा विस्तार करणारी आणि त्याचे स्वप्न पाहणाऱ्या राजकीय सामाजिक,चळवळीतल्या कार्यकर्त्या कलावंताचे महाराष्ट मनोगत आहे.

'महाराष्टची परंपरा पुढती नेण्यासाठी महाराष्टवरूनी टाक ओवाळू न काया' हे अण्णाभाऊंची महाराष्ट कल्पना निरंतर त्यांच्यावाङ्मयातून व्यक्त झाली. आजही अण्णाभाऊंच्या मनातील लोकशाहीच नंदनवन असणाऱ्या अखंड महाराष्टाचे स्वप्न अधुरेच आहे असे म्हणावे लागते. ?
रणधीर शिंदे
(दै. पुढारी : २६/७/२०२०)

Comments
Post a Comment