स्मरण अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे
अण्णा भाऊ साठे यांनी बहुविध स्वरूपाची वाङ्मयनिर्मिती केली. त्यांच्या वाङ्मयनिर्मितीला अनेकविध स्वरूपाची परिमाणे आहेत. सामाजिकदृष्ट्या अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्मरण हे नेहमीच समाजाला प्रेरक आहे. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सा रख्या छोट्या गावात अण्णा भाऊंचा जन्म झाला. रूढ शिक्षण न झालेले मात्र अवतीभवतीच्या समाजजीवनाने व सजीव अशा लोकपरंपरेने त्याचा मनःपिंड घडला. लहानपणीच अण्णा भाऊंच्या कुटुंबाला उपजीविकेसाठी मुंबईला जवळ करावे लागले. आणि एका नव्या संघर्ष भूमीत अण्णा भाऊंचा प्रवेश झाला. मुंबईच्या वास्तव्याने त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. एका कार्यकर्ता , लेखक , कवी म्हणून त्यांची घडण या शहराने केली. अण्णा भाऊंच्या सम ग्र लेखनात वर्गीय-जातीय भानाचा आविष्कार आहे. त्यांच्या वाङ्मयातील माणसे ही सर्वसामान्य , वंचित , कामगार , पीडित आहेत. ही पिचलेली मात्र न डगमगणारी जीवनाच्या संघर्षभूमीत सदैव उभी राहणारी. म्हणूनच प्र. क. अत्रे यांनी लढणार...