गोयां तुज्या मोगाखातीर
पुस्तके आवरत असताना अचानक एक वेगळा कवितासंग्रहात हाताशी आला. संग्रहाच्या प्रकाशनाच्या तपशिलाच्या ठिकाणी वेगळे शब्द पाहायला मिळाले. आणि कुतूहल अधिक चाळवले. त्यात किंमतीसाठी ' मोल ', मुद्रणासाठी ' छापपी ', मुखपृष्ठासाठी ' मुखचित्र ', पहिल्या आवृत्तीसाठी ' पयली खेप ', प्रकाशनासाठी ' उजवाडावनी ' या शब्दाने खिळवून ठेवले आणि कानामनात कोकणी भाषेचा नाद गुंजत राहिला. निमित्त माधव बोरकर यांचा ' अव्यक्ताची गाणी ' हा कोकणी भाषेतील कवितासंग्रह. साठेक पानांच्या या कवितासंग्रहातील कोकणी भाषेने जिज्ञासा अधिक वाढवली , त्याआधी कोकणी भाषेचे नाद मनात साठलेले होतेच. त्याला या कवितारूपाने हलकासा आवाज प्रतिसाद मिळाला. साहित्याच्या अंगणामध्ये भाषा , संस्कृती , भूगोलाची बंधनं नसतात याची जणू झलक या कविता भाषेने अधिक दुणावली. यापूर्वीही गोव्यातील कोकणी भाषेचे लहजे , सुरावटी , आकारांत आणि ओकारान्त , ' ना ' कारान्त ( नासिक्य उच्चारांची) भाषारूपांची वेगळी गंमत वाटायची. या नाद भाषेने स्वाभाविकच त्याकडे ओढला गेलो. बोरकारांच्या काव्यसंवेदन स्वभावाचा एक ...