Posts

Showing posts from August, 2020

गोयां तुज्या मोगाखातीर

Image
पुस्तके आवरत असताना अचानक एक वेगळा कवितासंग्रहात हाताशी आला. संग्रहाच्या प्रकाशनाच्या तपशिलाच्या ठिकाणी   वेगळे शब्द पाहायला मिळाले. आणि कुतूहल अधिक चाळवले. त्यात किंमतीसाठी ' मोल ', मुद्रणासाठी ' छापपी ', मुखपृष्ठासाठी ' मुखचित्र ', पहिल्या आवृत्तीसाठी ' पयली खेप ', प्रकाशनासाठी ' उजवाडावनी ' या शब्दाने खिळवून ठेवले आणि कानामनात कोकणी भाषेचा नाद गुंजत राहिला. निमित्त माधव बोरकर यांचा ' अव्यक्ताची गाणी ' हा कोकणी भाषेतील कवितासंग्रह. साठेक पानांच्या या कवितासंग्रहातील कोकणी भाषेने जिज्ञासा अधिक वाढवली , त्याआधी कोकणी भाषेचे नाद मनात साठलेले होतेच. त्याला या कवितारूपाने हलकासा आवाज प्रतिसाद मिळाला.   साहित्याच्या अंगणामध्ये भाषा ,  संस्कृती , भूगोलाची बंधनं नसतात याची जणू झलक या कविता भाषेने अधिक दुणावली. यापूर्वीही गोव्यातील कोकणी भाषेचे लहजे , सुरावटी , आकारांत आणि ओकारान्त , ' ना ' कारान्त ( नासिक्य उच्चारांची) भाषारूपांची वेगळी गंमत वाटायची. या नाद भाषेने स्वाभाविकच त्याकडे ओढला गेलो. बोरकारांच्या काव्यसंवेदन स्वभावाचा एक ...

अण्णाभाऊसाठे यांच्या दृष्टीतील महाराष्ट्र

Image
          अण्णा भाऊ साठे यांची महाराष्ट्र   संकल्पना ही व्यापक   समाजशील स्वरूपाची आहे. त्यांच्या महाराष्ट्र संकल्पनेमागे राजकीय ,  सामाजिक विचारदृष्टीची   पार्श्वभूमी   आहे .  महाराष्ट्र संकल्पनेचा उच्चार   त्यांच्या   लेखनात   केंद्रीय स्वरूपात   आहे .  अनेक लेखकांनी महाराष्टा विषयीची   जाण व्यक्त केली. त्यांच्या    महाराष्ट्र रचितामागे काळ ,   प्रदेश ,  इतिहास   तसेच   समाज सत्तासंबंधाची जाणीव आहे. तसेच   इतिहास   परंपरेने घडविलेल्या महाराष्ट्र भूमीचा कानोसा   देखील आहे.                      मात्र या सगळ्यांपेक्षा अण्णाभाऊंची महाराष्ट्र संकल्पना अधिक व्यापक   आहे .  भूमी   आणि   भाषिक   समूह   म्हणून   ती   वर्धमान स्वरूपाची आहे.  अण्णा भाऊंच्या शाहिरीत महाराष्ट्र इतिहास ,  भूमिपरंपरा ,  राजकीय ,  सामाजिक   आणि सांस्कृतिक वैविध्य ...